Wednesday, December 12, 2018

स्वराज्य!!

अस्तास जाई तो इतिहास कसला
स्वराज्य व्हावे ही तर श्रींची ईच्छा !!
गनिमिने रक्षिला गड़ अमुचा
बघ जयजयकार घुमतो,
अवघा सह्याद्रि अमुचा
अवघा सह्याद्रि अमुचा !!

जिथे ढाल बनून खुद्द तानाजी
अन तलवार बनून उभा ठाकला बाजी
ही जातच होती सिंहाची
कसा मग गावनार हो शिवाजी!!

सांगा त्या औरँगजेबास;
बेभान होऊन त्या समयास
रक्त जयांनी सांडियले,
पैक्यास ईमान न विकले,
तयांनीच  स्वराज्य साकारले

म्हणून मुक्त आसमंतात भगवाही
एकच गान गात आहे,
अस्तास जाई तो इतिहास कसला
अवघा सह्याद्रि अमुचा
अवघा सह्याद्रि अमुचा !!

-चेतन कोठावदे