आज दुःखाने मोर्चा काढला!!
म्हणे,आरक्षण पाहिजे त्याला!
सर्वच असतात सुखाच्या शोधात,
दुःख आले की मात्र पळ काढतात
आता आरक्षण पाहिजे त्याला!
सुखाचा तर नेहमीच सोहळा साजरा;
दुःखाच्या आगमनाने मात्र
टवकारलेल्या नजरा,
सुखासाठी नेहमी गर्दी भारी;
मग दुःखच का हो वैयक्तिक मक्तेदारी?
दुःख विव्हळले,
मग खवळले,
आता हे चालणार नाही!
साऱ्या सुखांचे दारे मोडत
दुःख निघाले बंड करत...
(एकच नारा देत..
"हमारी मांगे पूरी करो
20% आरक्षण हमे भी दो।")
विरह,आजार, विकार,मृत्यु
ह्या सर्व जाती एकत्र जमल्या,
मग प्रत्येकाने आपले दुःख मांडले..
'कुणी घेईना आपल्यास मनावरी!
आपण सारे Temporary'
म्हणून; आता आरक्षण हवे !
दुःखाचा मोर्चा नियतीच्या
दरबारी पोचलाSSS
अन् पाहतो तो काय ??
तिथेही आधी हजेरी सुखाची!
आता मात्र दुःख चवताळले,
सुखाच्या अंगावर धावून गेले
मग दोघांची चिखलफेक सुरु..
नियतीला पडला प्रश्न;
आता काय करू?
ऐकून सारी वार्ता,
मग नियतीने घेतले सूत्र हाती
(Silence!!)
" जाणून आहे तुमचे सारे बहाने
आता थोड़े सबुरीने घ्यावे।
किती डोकावे मानवी जीवनी
हे नाही आपुल्या हाती,
हा निर्णय असे सर्वस्वी 'त्याचा'
आरक्षण मिळणे नाही कुणासही आता!
प्रयोजनाने जरी मी तुम्हास धाडीले
जीवनी मानवाच्या; तरी
किती नांदावे सुखाने वा दुःखाने,
हे गणित मात्र असते "त्याचे"।
जर नियति एक नाणे अनोखे!
तर तुम्ही नाण्याच्या बाजू दोन!
जाणा एकचि सत्य आता;
नियतीचे नाणे पडते नेहमी उभेच !
सुख अन दुःख हे ध्रुव दोन,
जशी दिवासमगुन रात्र
अन रात्री मागुन येतो दिन
तैसा तुमचाहि लपंडाव!!
दुःखाचे गर्भी लपलेले सुखाचे बीज🌻
हेच जाणा असे वास्तव!!
म्हणून ध्यानी असुदया गोष्ट एक,
सुखे दुःखे समे कृत्वा।
ज्यांसी ठाऊक हा मंत्र,
तेथे न ये कामास
तुमचे आरक्षण तंत्र "☺️
ऐकता ऐशी नियतीची वाणी
समज उभयतांस आली!!
दुःख झाले आता शांत,
नको मुळी आता आरक्षणाचा आकांत
'सुख तर आहे माझा पठिराखा☺️
अमुचा वाद आता संपुष्टात आला'।
मंत्र मात्र विसरु नका
सुखे दुःखे समे कृत्वा!!
-चेतन कोठावदे
म्हणे,आरक्षण पाहिजे त्याला!
सर्वच असतात सुखाच्या शोधात,
दुःख आले की मात्र पळ काढतात
आता आरक्षण पाहिजे त्याला!
सुखाचा तर नेहमीच सोहळा साजरा;
दुःखाच्या आगमनाने मात्र
टवकारलेल्या नजरा,
सुखासाठी नेहमी गर्दी भारी;
मग दुःखच का हो वैयक्तिक मक्तेदारी?
दुःख विव्हळले,
मग खवळले,
आता हे चालणार नाही!
साऱ्या सुखांचे दारे मोडत
दुःख निघाले बंड करत...
(एकच नारा देत..
"हमारी मांगे पूरी करो
20% आरक्षण हमे भी दो।")
विरह,आजार, विकार,मृत्यु
ह्या सर्व जाती एकत्र जमल्या,
मग प्रत्येकाने आपले दुःख मांडले..
'कुणी घेईना आपल्यास मनावरी!
आपण सारे Temporary'
म्हणून; आता आरक्षण हवे !
दुःखाचा मोर्चा नियतीच्या
दरबारी पोचलाSSS
अन् पाहतो तो काय ??
तिथेही आधी हजेरी सुखाची!
आता मात्र दुःख चवताळले,
सुखाच्या अंगावर धावून गेले
मग दोघांची चिखलफेक सुरु..
नियतीला पडला प्रश्न;
आता काय करू?
ऐकून सारी वार्ता,
मग नियतीने घेतले सूत्र हाती
(Silence!!)
" जाणून आहे तुमचे सारे बहाने
आता थोड़े सबुरीने घ्यावे।
किती डोकावे मानवी जीवनी
हे नाही आपुल्या हाती,
हा निर्णय असे सर्वस्वी 'त्याचा'
आरक्षण मिळणे नाही कुणासही आता!
प्रयोजनाने जरी मी तुम्हास धाडीले
जीवनी मानवाच्या; तरी
किती नांदावे सुखाने वा दुःखाने,
हे गणित मात्र असते "त्याचे"।
जर नियति एक नाणे अनोखे!
तर तुम्ही नाण्याच्या बाजू दोन!
जाणा एकचि सत्य आता;
नियतीचे नाणे पडते नेहमी उभेच !
सुख अन दुःख हे ध्रुव दोन,
जशी दिवासमगुन रात्र
अन रात्री मागुन येतो दिन
तैसा तुमचाहि लपंडाव!!
दुःखाचे गर्भी लपलेले सुखाचे बीज🌻
हेच जाणा असे वास्तव!!
म्हणून ध्यानी असुदया गोष्ट एक,
सुखे दुःखे समे कृत्वा।
ज्यांसी ठाऊक हा मंत्र,
तेथे न ये कामास
तुमचे आरक्षण तंत्र "☺️
ऐकता ऐशी नियतीची वाणी
समज उभयतांस आली!!
दुःख झाले आता शांत,
नको मुळी आता आरक्षणाचा आकांत
'सुख तर आहे माझा पठिराखा☺️
अमुचा वाद आता संपुष्टात आला'।
मंत्र मात्र विसरु नका
सुखे दुःखे समे कृत्वा!!
-चेतन कोठावदे