सोहळा आगळा माझ्या विठ्ठलाचा
ध्वज फडके गगनी हरी नामाचा
संत जन्म वाहति जयाच्या प्रवहात
जाणा हीच भक्तिची इंद्रायणी थोर!
होता संतसंगतीचा स्पर्श
मतीचे जाय दवडून बालपण;
मनी आपुल्याही व्याहे संतपण।
न हे कुणा गबाळ्याचे काम
संगतीत राहण्या लागे भाग्य थोर
जिव्हेसि होता स्पर्श नामाचा 'विठ्ठल'
जगी उद्धार जाहला तयाचा सकल
जाऊनिया चला वारिसी एकवार,
घेऊ पांडुरंगाची भेट!
सोहळा आगळा माझ्या विठ्ठलाचा
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल।।
-चेतन कोठावदे