*गणेशोत्सव निमित्त- शुभेच्छा भावपुष्प...*
बाप्पा येईल आनंदाने
घर जाईल भरून,
बघता बघता क्षणात सगळं
दु:ख जाईल सरून
दिवा लावून सत्विचारांचा
मागुया मागणे बुद्धीचे,
विकारांचे सांडून माप
दर्शन घेऊ विघ्नहर्त्याचे
मी मी केले ,माझ्यामुळे झाले
कुठवर नेणार अहंकार?,
तूच केले , तुझ्यामुळे झाले
कृतज्ञ भाव, फुले आणि हार
गणांचा तो गणपती,
नित्य करूया त्याचे ध्यान,
नसलीच जरी दुर्वांची जुडी
ठेवूया भावपूर्ण भक्तीचे भान
शाश्वत नाही जीवनी आपुल्या
पद पैसा अन् प्रतिष्ठा,
एकात्मतेचे दान मागण्या
ठेवू अढळ एकदंतावर निष्ठा
मूर्ती मधील गणेश
मनात आकार घेवो,
सत् विचरांच्या सहवासात
षड् विकार गमन होवो
ढोल ताशांच्या गजरामध्ये
आज बाप्पांचे आगमनम्
माणुसकीच्या धर्मामध्ये
"गणेशोत्सवाचे सुस्वागतम्"!!
*श्री गणेशाय नमो नमः!!*
रचनाकार - चेतन कोठावदे,पुणे (MH 15/12)