Saturday, April 27, 2019

राम-whatspp


(रामनवमी निमित्त) रामाचे व्हाट्सप ला पत्र!!!

हैलो व्हाट्सप,
आज तुझ्यामुळे मला अनेक भक्तांच्या
भरभरून शुभेच्छा मिळाल्या

आज तुझ्यामुळे मला माझ्या कितीतरी
 *so called* भक्तांच दर्शन झाल.

अनेकांनी message केले, status ठेवले,
चक्क काहींनी D.P. बदलले.

पण खर सांगू का ?
काही तरी खटकतय;
नाही; म्हणजे तुझ्या अस्तित्वाच कौतुक आहेच,
पण तरी ...

पूर्वी मला ही सारी मंडळी कधी मंदिरात भेटयची,
तर कधी ; 
सांज दिव्याच्या उजेड़ात राम स्तवन करताना

माझ्याशी सुख दुखः share करायची
त्यांचा अंतरंग सहज उलगडायची,

कितीही दुःखी कष्टी झाली तरी;
रामरक्षेतुन मला आपलंस करायची

एकमेकांना राम-राम म्हणत गळा भेट व्हायची,
खर तर तेव्हा मला अत्यंत हर्ष होतसे !!

पण आज जेव्हा तुझ्या माध्यमातून
ह्याना भेटलो तर...
कीव आली रे ह्यांची!

आई बापाला संपत्ति ची लालसेतुन
वेठीस धरणारा म्हणतोय,
Happy Ram navmi

ज्याच्यासाठी; कुठला धर्म नी कौनसा कुल?,
आज किया गंदा काम; कल जायेगी दुनिया भूल,
आणि तो म्हणतो
Happy Ram navmi

जमिनीच्या तुकडयासाठी
ज्याने घ्यावा भावाचाच जीव,
तोहि म्हणतोय
Happy Ram navmi

भोगा साठी बायको भोगुन
नंतर दिली वाऱ्यावर सोडुन,
तोहि म्हणतोय
Happy Ram navmi

खुर्चीलाही किळस यावी
असे राजकारण जयाच्या ठायी,
तोहि म्हणतोय
Happy Ram navmi

दिन रात एकच करी जप जो,
असेल हरी तर देईल खाटल्यावरी
तोहि म्हणतोय
Happy Ram navmi

मैत्री म्हणजे निस्वार्थता
हेही ज्याला उमगले नाही
तोहि म्हणतोय
राम राम!! राम राम!!

मग नक्की जिंकल कोण?
नीतिमत्ता की व्हाट्सप कट्टा??

मग नक्की राम उरलाय कुठे?
की सीमित फक्त प्रतिमेसाठी?

माझ्या प्रतिमेस नको केवळ हार अन फुले,
हवीत मला आशादायी रसाळ मने,
जी राम आचरतील,
अन पुन्हा रामजन्म साकारतील।

मनातला राम परत जागा व्हावा
अन रामराज्याची नांदी व्हावी
हीच एकमात्र आशा!!

माझ्यातील प्रत्येक गुणाच तुमच्या 
जीवनातील प्रगटीकरण
हाच खरा माझ्यासाठी *रामजन्म*!! 

मन से रावण जो निकाले राम उसके मन मे है।।

बघ; तुला हे  मांडता येतय का ?
तुझ्या *Status* मधून

तुमच्यतलाच,
राम!!

-चेतन

4 comments:

  1. अगदी मार्मिक! फारच मनापासून आलेलं लेखन..

    ReplyDelete
  2. Mast. Khupach chan👌👌

    ReplyDelete
  3. Khup chan👌👌👌

    ReplyDelete
  4. Khup Chan Bhau 👌

    ReplyDelete