Wednesday, April 15, 2020

छंद रामाचा !!

ज्याला छंद नाही रामाचा
तो देह काय रे कामाचा?
ज्याला गंध नाही भक्तिचा
तो जन्म नाही मुक्तीचा..!

पितृआज्ञा शिरोधारी
राम गेला वनवासी,
कंटकांच्या मार्गातुनि
संस्कृतीचा थाट भारी,
पितृभक्त ऎसा होणे
होते योग्याचे ध्यानी!

भरताने त्यागावी राजगादी
लक्ष्मणाने चरणी सेवा द्यावी,
असे बन्धुत्वाचे शील होते
जीवन रामाचे आदर्श होते..

मैत्री राम सुग्रीवाची
रावणास पडली भारी,
हनुमंतासम सेवक जेथे
जानकीस्तव जो लंका जाळे!

नीतिमत्तेच्या शिळेवरी
राज्य उभे श्रीरामाचे ,
वचनबद्ध ते जीवन होते
कौसल्या पुत्र वीराचे !

करावे रामाचे कंदन
व्हावे नाश रघुनंदन,
कपट ऐसे मनी जयांचे
मनोरथ जाहले भस्म तयांचे..

संहारूनी दुर्जनांसी
रक्षिण्या सदा सज्जनांसि,
वल्लभ घेई अवतार रामाचा
धर्म क्षत्रिय करी वध रावणाचा!

मनातूनि राम जागरण
रामावीन जीवन ते मरण,
खरी शिदोरी भक्तीची
नांदी ही रामराज्याची।

सत् रक्षणाय
खल निग्रहणाय।
रामाय तस्मै नमः
रघुनाथाय नमो नमः।।

-चेतन कोठावदे

25 comments:

  1. खुपच सुंदर रचना ....

    ReplyDelete

  2. खरच चेतना जागवि तुमच्या रचानितूनी !

    ReplyDelete
  3. व्यक्त झाल्या भावना तुमच्या
    चेतना जागल्या आमच्या !

    ReplyDelete
  4. Jai shriram
    Sundar ������

    ReplyDelete
  5. भक्तीच्या गंधाने मंत्रमुग्ध झालेला श्रीरामांचा छंद हाच तर खरा जीवनाचा आनंद

    ReplyDelete
  6. Waa, khup chan lihila ahes chetan !😊

    ReplyDelete
  7. खुप छान

    ReplyDelete
  8. अप्रतिम

    ReplyDelete