जय योगेश्वर; नाही केवळ
मंत्र ध्यानी मनी जपाचा,
इथे साधतो सहज समन्वय
ज्ञान, कर्म, अन् भक्तीचा !
उन्नतीचा सात्विक मार्ग
स्वाध्यायाची हाक आर्त,
रोवून गेले पांडुरंगी दादा
ध्वज पंचरंगी क्रांतीचा !
तेज पताका लावून गेले
तिन्ही काळच्या संध्येची,
जाणीव आम्हा देऊन गेले
शांती, स्मृती, अन् शक्तीची
हीन दीन न येथ कोणी
"पुत्र सारे देवाचे" ,
पद्म फुलविले अमुच्या जीवनी
शतदा वंदन दादांचे !!
संस्कारांची देऊनी शिदोरी
ध्रुवासम बालकत्व दिले,
"धर्मं चर" चे गिरवीता धडे
लाभे नैतिकतेचे शिक्षण भले!
तीन 'त'कारी गुण सांगुनी
यौवनी शुद्ध प्राण फुंकले,
अविचल ध्येयवृद्धी पोषक
गुण दर्शने चारित्र्य दिले
कृतज्ञतेचा दिवा तेववूनी
स्मरण करविले ऋषीसंतांचे,
संस्कृतीस्तव जन्म जयांचे
वंदावी ती ध्यासपंथी पाऊले !
कृतीभक्तीची मशाल घेऊनी
उभारली शाळा प्रयोगांची,
मत्स्यगंधा अन् वृक्षमांदिरी
भगवंताचे आम्ही पुजारी !
गावोगावी जाऊन आम्ही
पाईक होऊ रामाचे;
अन् बांधू सेतू संबंधांचे,
शिवोहमचा ध्यास धरुनी
होऊ वारस नचिकेताचे !
घेऊनी मुखी नाव प्रभूचे
गातो मंत्र उपनिषद् अष्टकांचे,
उंचावू जीवने गीता आचरूनी
होऊ; सारे लाडके योगेश्वराचे
संकल्पांचे पुष्प वाहुनी
भाव भक्तीचे स्वर झंकारूनी,
साकार करतो आम्ही सारे..
दादा तुमची जन्मशातब्दी!!
दादा तुमची जन्मशातब्दी!!
-- चेतन कोठावदे
वा वा चेतनभाऊ. एकदम छान. आम्हा सर्वांच्या भावना तुम्ही समर्पकपणे व्यक्त केल्यात. योगेश्वर तुमची लेखणी अशीच तळपवत ठेवो.
ReplyDeleteवाह चेतन भाऊ , एकदम मनाला भिडुन जातय
ReplyDeletehttps://shwetush.blogspot.com/2020/10/blog-post_18.html
ReplyDeleteअप्रतिम ����
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteअप्रतिम भाऊ
ReplyDeleteNice bhau
ReplyDeleteVery nice bhau
ReplyDeleteजय योगेश्वर भाऊ
ReplyDeleteछान
भाऊ, अप्रतिम लिहिलं आहे. थोडक्या शब्दात पू. दादजींच्या महानतेचं दर्शन घडवलंत!
ReplyDeleteछान 🤗🤗🤗
ReplyDeleteखूपच छान..👌👌
ReplyDeleteSuper
ReplyDeleteछान 👌
ReplyDeleteचेतनभाऊ आपण जे लिखाण केलं आहे ते जर प्रत्येक व्यक्तीने स्वत च्या आयुष्यात उतरवलं तर तो सूर्यासारखा तेजस्वी होईल 😊
ReplyDelete