Tuesday, April 9, 2024

गुढी

चला उभारू मनामनात 
गुढी सृजन संकल्पांची, 
प्रतिक आपुल्या परंपरेची
विजय पताका संस्कृतीची

चैत्र पाडवा घेऊन येतो
पर्वणी नव प्रेरणेची,
आशादायी भविष्य भूषण
नांदी ही समृद्धीची!

कुणी दीन अथवा हीन नाही
दुबळा येथे कुणी मानव नाही
चैतन्याची ज्योत अखंडित
तेवत राहो ऊर्ध्वगामी..!!

चला उठुया नव निर्धाराने
प्रेरित केल्या ह्या सणाने,
गुढी उभारू सर्जनतेची
मानव्याच्या कल्याणाची!

- सचेतन
चेतन कोठावदे,
पुणे (MH 15/12)


 

No comments:

Post a Comment