Friday, March 22, 2024

*शीर्षक : ध्यास पांडुरंग*

निघाले घेऊन मी
डोई विठ्ठल रखुमाई,
संत संगाची शिदोरी
मुखी ज्ञानोबा मुक्ताई!

चालते वारी वाट
टाळी मृदुंगात दंग,
ध्वज भक्तीचा भगवा
नाचे माझ्या संग!

नयन झाले आतुर
लागली पंढरीची आस
मनी जपत पांडुरंग
जीवा चरणांचा ध्यास

साज शृंगार घेऊनी
निघाली मी अनवाणी,
तुजसाठी भगवंता
गाते ओवीतून गाणी!

संगे तुझ्या विठुराया
पुष्प वर्षावात न्हाते,
एकल्यास नाही थारा
हे मनुष्य देहात जाणते!

*- चेतन कोठावदे*
*पुणे, ९०२८२४९६७१*

No comments:

Post a Comment