Sunday, March 17, 2024

अनुभवातून अनुभूती कडे

*अनुभवातून अनुभूती कडे*

काटेरी पाय वाटांवरून चालणे आपुलेच आहे
न दोष कुणा परक्याचा येथे, न प्रारब्धाचा आहे
फाटकीच जर झोळी आपुली, तर सांग साधका ...
समोर असता कर्ण लाख, वेचने तुझ्या कर्मात नाही!


नसतो येथे शत्रू कुणी, न येथे कुणी मित्र थोर ,
तुझी वाट तुलाच शोधणे,धनी त्याचा दुसरा कोण..
हिमनगासम ठेवी बुद्धी; अन् मधासारखी वाणी!
हे सूत्र जाण खरे यशाचे, सोबतीला नारायणी शक्ती

क्षणभर आहे माया इथली, क्षणभर सारीपाट
कुठे शोधसी "राघव"सांग?, नाही तुला अंतरीचा ठाव!
सरतील सारे बंध येथे, सारा कर्मांचा इतिहास
घेतले बहु जन्म जरी, ही वाट एकट्याचीच तू जाण!!

झाले येथे थोर बहुत, सांगती अनुभवाचे बोल
कार्य नेले सिद्धीस, मन त्यांचे अनुभूतीत खोल, 
दांभिकतेची नकोच कास, असता पांडुरंगाची साथ
विटला जरी संसार सारा , न मिटला कधी 'त्याचा' भास/ ध्यास!


- चेतन कोठावदे 
(अनुभवातून अनुभूतीकडे)

No comments:

Post a Comment