आभाळच ध्यास असणाऱ्यांनी
क्षितिजाच्या मोहात पडायचं नसत,
नदी बनून प्रवाहित झाल्यावर
परत तलावाच अस्तित्व वाट्याला नसत!
हाती गांडिव येता
अर्जुना सारखं धर्मार्थ लढावं
माणसाचा देवही होतो
फक्त कर्म रामकृष्ण सारखं जगावं!
इथे कुणी पाहिले दगडाचा देव होताना
पण देवाचं दगडपन लोक विसरत नाही
माणुसकीचे गणित आगळे ;
स्वार्थ साधला की माणूसपण टिकत नाही
निर्धार असला मोठा कितीही
तरी आळसाच ग्रहण चुकत नाही
ध्यास लागतो ध्येयाचा,
साधनेशिवाय ज्ञानालही पाझर नाही
- चेतन कोठावदे
(MH 15/12)
No comments:
Post a Comment