Saturday, August 23, 2025

तुझ्या अस्तित्वाची मला जाण व्हावी

ऐशी वारी जीवनात पुन्हा पुन्हा व्हावी 
देवा तुझ्या अस्तित्वाची मला जाण व्हावी 

उत्कटता तुझ्या दर्शनाची हरी मना लाघवी 
दर्शनाने अवचित तुझ्या भाव गंगेत माधवी 

तुझ्या नामघोषात सारी वारी आज दंग 
गेले लयास व्यंग गाता तुक्याचे अभंग 

सरू दे - सरू दे दाहक वेदनेच रंग 
आत्ता उरली ओढ भेटी लाहो पांडुरंग 

कुठला कोण मी? मज आठवेना 
 पडला विसर अहंता सापडेना 

नाम स्पर्शाने तुझ्या झालो उदका समान 
माझे असे काही...आता उरले ना भान 

- सचेतन 

No comments:

Post a Comment