Wednesday, October 1, 2025

विकारांचे सीमोल्लंघन!

दसरा - विजयादशमी हा सण केवळ उत्साह वाढवणारा दिवस नसून आपल्याला आत्मचिंतन करून शुद्ध होण्याची संधी देणारा दिवस आहे

दर वर्षी आपण रावण दहनाचा कार्यक्रम परंपरेनुसार पार पाडतो आणि विजयादशमी साजरी केली असे म्हणतो, पण केवळ बाहेरचा रावण जाळून अंतरमनात उजाळा येणार का हो?
माझ्या जीवनातील खरा रावण कोणता हे मी जाणले आहे का हो??

"मन से रावण जो निकाले राम उसके मन मे है!!"

 म्हणजेच आपल्या सर्वांच्या मनात रावण कुठेतरी घर करून उपस्थित आहेच.. विकारांच्या स्वरूपात! 

आपण सर्व विकसित तंत्रज्ञानाच्या युगात वावरतोय आपण मोठमोठ्या पदव्यांचे शिक्षण घेतो, मग वैयक्तिक आणि पारिवारिक उदरनिर्वाह करत असताना छोट्या मोठ्या चांगल्या पदांवर काम करतो , सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याचा जपण्याचा प्रयत्न करत असतो अशा प्रकारे पद, पैसा आणि प्रतिष्ठा कमावत असताना आपले मन दुनियादारीच्या ह्या स्पर्धात्मक युगात सह‌जच विकारांच्या खोल गर्तेत; कधी खोलवर जाऊन बसते हे आपल्यालाच समजत नाही. परीणामी रावणाची दहा तोंडे काम, क्रोध, मोह, मत्सर, आळस, भीती, शंका, असत्य, अहंकार आणि लोभ ही आपल्या मनात बीभत्स तांडव करत असतात आणि जर वेळीच ह्या शत्रुवर आपण नियंत्रण नाही मिळवले तर तो आपल्याला गिळंकृत करू शकतो.

म्हणून आजचा दिवस "विजयादशमी" आपल्याला सांगते की आत्मचिंतन करा, शत्रु बाहेर नाही तर तो आत बसलाय अंतर्मनावर विजय मिळवा! स्वतःच्या कमकुवतपणावर शक्ती उपासना करून विजय मिळवा. मी दीन,हीन, दुबळा, लाचार नाही तर मी पराक्रमी आहे, शूर आहे सकारात्मक आहे हा सद्‌भाव स्थिर करा. भगवंताचा अंश माझ्यात आहे मी करू शकतो, बदलू शकतो हा विचार जीवनात स्थिर करून जीवन बदलवत नेणे हा खरा पराक्रम | माझ्या जीवनान मिळवलेले ज्ञान, प्रतिष्ठा ह्याचा अहंकार होऊ न देता नम्रतेने सर्वसमावेशक भूमिकेतून संघात्मक, एकत्रित कार्य उभे करणे हो पराक्रम आहे!

"Lead By The Example !" आपल्या जीवनातून चरित्रातून चांगल्या नीतीमूल्यांचा जागर करूयात, आत्मसंयम क्षमाशीलता, पराक्रम, नम्रता, सत्य, संस्कृती मूल्यांविषयी तत्परता हे प्रभू श्रीरामांच्या जीवनातील गुण आपण प्रयत्नपूर्वक चिंतन करून आपल्या जीवनात, आचरणात आणण्याचा प्रयत्न करुयात.  
समाजामध्ये एकात्मिक भावनेने काम करूया; मी केले माझ्यामुळे झाले हा अहंकार टाकून; "भगवंताने बुद्धी दिली म्हणुन शक्य झाले" असा नम्र आणि कृतज्ञतेचा भाव अधिक उदात्त आणि उन्नत आहे तो रुजवूयात !

आपल्या मनामनातील 'राम' अधिक विशाल केला तर रावणावर विजय साकार होईल आणि हीच खरी आजची विजयादशमी !

चला तर विकारांचे सिमोल्लंघन करून आळस, भय, मत्सर, शंका, स्वकेंद्रितपणा, अहंकार हे जाळून टाकुयात ! विकार रूपी रावणाच दहन करून, सत्‌गुणी रामाचं चिंतन करूया, सद्‌गुणांच सोनं लुटूया आणि खरा दसरा साजरा करूया !!

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात।।

-  सचेतन
चेतन कोठावदे,
पुणे (MH 15/12) 






9 comments:

  1. छान लेख आहे सर .

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर

    ReplyDelete
  3. खुप छान

    ReplyDelete
  4. खुप कॅन लिहिल आहे सर

    ReplyDelete
  5. खूप भारी लेख आहे सर

    ReplyDelete
  6. Khupch chagli mahiti aahe sir kittekana mahiti pan Nasel

    ReplyDelete
  7. खूप सुंदर लेख आहे

    ReplyDelete