तूच जाणसि मनीचे सर्व
तूच माय अन बाप
तुजसाठी राहू कृतज्ञ
विसरून देहभान
तूच उत्तर प्रश्नांच् साऱ्या
तूच आशेचा किरण ...
दांभिक आहे सर्व पसारा
तूच एकची सत्य ..!!
अस्तित्वाचं तत्व तू!
जगण्यातलं मर्म तू!
तूच सर्वव्यापी पूर्ण!
अणू ते ब्रह्मांड तू!
गाभाऱ्यातला आत्मा तू
देहातल चैतन्य तू
हरवलेल्याची माय तू
भटकलेल्यांच ध्येय तू
तूच सर्वव्यापी पूर्ण
तूच अणू ते ब्रह्मांड
तुला कोण नाकरेल
नकरातला आकार तू!
असलास तू तर जाग आहे
नसतास तू तर केवळ आभास आहे
आहेस तू- तर जाग आहे
नाहीस तू- तर जग आभास आहे
कसे कोण नाकारेल तुला?
नकारातला आकार तू!
तूच जाणसि मनीचे सर्व
तूच माय अन बाप रे
तुजसाठी राहू कृतज्ञ
विसरून देहभान हे!
- सचेतन
चेतन कोठावदे,पुणे (MH 15/12)